Rashmi Mane
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अभिनव योजना.
पिंक ई-रिक्षा योजना म्हणजे नेमकं काय? तर राज्य सरकारकडून महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत मिळते या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना व्यवसायाची संधी मिळवून देणे.
सुरुवातीला 10 जिल्ह्यांत राबवली जात आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड. पुणे शहरात 2800 महिलांना रिक्षा वाटप होणार आहेत.
20% रक्कम शासनाकडून अनुदान
70% कर्ज बँकेतून
10% स्वतः महिलेने भरायचे
महिलांना व्यवसायाची संधी मिळेल. स्वतःचे उत्पन्न निर्माण करण्याची संधी मिळेल.
सुरक्षित आणि सन्मानजनक उपजीविकेचा मार्ग मिळेल.
महाराष्ट्रातील महिला असावी. वय 21 ते 40 वर्षे असावे.
कर्जबाजारी नसावे. इतर सरकारी योजनांचा लाभ घेतलेला नसावा तसेच
फक्त एकदाच योजना लागू असावी.
कागदपत्रांची पूर्तता आवश्यक. बँक कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी पात्रता तपासली जाते.
कर्जाची जबाबदारी पूर्णतः महिलेची.
महिलांसाठी विशेष योजना, स्वावलंबन आणि सुरक्षितता यांचा संगम, महिला उद्योजकतेला चालना.