Rashmi Mane
देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे पीएफ (प्रॉविडंट फंड) खाते आहे, जिथे प्रत्येक महिन्याला त्यांच्या पगारातील ठराविक रक्कम जमा केली जाते.
पूर्वी पीएफ काढताना अनेक अडचणी येत होत्या. विविध कागदपत्रांची आवश्यकता असायची आणि प्रक्रिया वेळखाऊ होती.
मात्र आता ईपीएफओने पीएफ खात्याशी संबंधित नियमात बदल केले आहेत, ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित झाली आहे.
नवीन नियमांनुसार, तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना आता आपले पैसे सहज आणि लवकर मिळू शकतात.
तसेच, सध्याच्या नियमांनुसार जर एखादी व्यक्ती एक महिन्याहून अधिक काळ बेरोजगार असेल, तर ती व्यक्ती पीएफ खात्यातून 75 टक्के रक्कम काढू शकते.
पीएफ खात्यात कर्मचार्यांना कमीत कमी 25 टक्के रक्कम कायम ठेवावी लागते आणि या खात्यावर सध्या 8.5 टक्के व्याज मिळते. यावर चक्रवाढ व्याज लागू होते, ज्यामुळे जमा रक्कम अधिक वाढते.