प्लॅस्टिकच्या नोटा येणार चलनात; वेगळ्या कशा? फायदे-तोटे काय?

Amit Ujagare

प्लॅस्टिक नोटा

प्लॅस्टिकच्या नोटा म्हणजेच पॉलिमर नोटा या कागदी नोटांपेक्षा वेगळ्या मटेरिअलपासून बनवलेल्या असतात. त्या हुबेहुब दिसायला कागदी नोटांसारख्याचं असल्या तरी त्या हाताळताना वेगळा भासतात.

RBI Plastic Notes

कशापासून बनवतात?

कागदी नोटांप्रमाणं कापूस आणि कागदाऐवजी त्या विशेष अशा प्लॅस्टिकपासून म्हणजेच पॉलिप्रॉपिलिन पासून बनविलेल्या चलनी नोटा असतात.

RBI Plastic Notes

फायदे काय?

अधिक टिकाऊ : प्लॅस्टिकच्या नोटा या कागदी नोटांपेक्षा साधारण ५ पट जास्त टिकतात. पाण्यात भिजल्यानं त्या खराब होत नाहीत, त्यावर वारंवार हाताळल्यामुळं मळ साचत नाही. त्या सहजासहजी फाटत नाहीत.

RBI Plastic Notes

बनावट नोटा

प्लॅस्टिकच्या नोटांमध्ये होलोग्राम, सूक्ष्म छपाई यांसारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांमुळं बनावट नोटा तयार करणं कठीण आहे.

RBI Plastic Notes

स्वच्छता :

धूळ, मळ, तेलकटपणा, चिकटपणा आणि त्यामुळं जंतू संसर्ग यामुळं कमी होतो, कारण या नोटांवर मळ साचत नाही.

RBI Plastic Notes

तोटे काय ?

खर्च जास्त : उत्पादनासाठी विशेष तंत्रज्ञान आणि साहित्य लागते.

RBI Plastic Notes

घडी पडत नाही :

या नोटांना घडी घालणं कठीण जातं कारण त्याची जाडी ही कागदी नोटेपेक्षा काही प्रमाणात जास्त असते. त्यामुळं या नोटा पाकिटात ठेवताना अडचणीच्या ठरु शकतात.

RBI Plastic Notes

विशेष पुनर्वापर प्रक्रिया :

सामान्य कागदी नोटांप्रमाणं या नोटांची विल्हेवाट लावता येत नाही, यासाठी स्वतंत्र पुनर्वापर व्यवस्था आवश्यक असते.

RBI Plastic Notes

बसपाचे एकमेव आमदार शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहीले; कोण आहेत उमाशंकर सिंह?

Umashankar Singh Thakur
<strong>इथे क्लिक करा...</strong>