सरकारनामा ब्यूरो
स्वत:चे घर असावे ही प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. परंतू आर्थिक विंवचनेचा सामना करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटूंबाचा कणा वाकलेला असतो, बहुतेकदा अनेकांना घरासाठी आयुष्याची जमापुंजी खर्चावी लागते.
अनेक मध्यमवर्गीय कुटूंबांच्या स्वप्नपुर्तीसाठी मोदी सरकारीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना आणली आहे.
मध्यमवर्गीय कुटूंबांची स्वप्नपुर्ती करण्यासाठी मोदी सरकारची प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभदायक ठरत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटूंबाला स्वत:च्या घरात राहता यावे यासाठी मोदी सरकारची ही महत्वकांक्षी योजना ठरत आहे.
अनेकदा घर खरेदीसाठी बऱ्याच कालावधीसाठी मोठ्या व्याजदराने (EMI) होम लोन घ्यावे लागते, जे सामान्य व्यक्तींना शक्य नसते, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याच काम केले आहे.
मागील (2024) वर्षी केंद्र सरकारने आवास योजना-शहरी (PMAY-U) 2.0 साठी देखील मंजुरी दिली आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत, कमी उत्पन्न गटातील लोकांना घर खरेदीसाठी व्याजदरात सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
आवास योजना-शहरी (PMAY-U 2.0) साठी केवळ 35 लाखांपर्यंतची किंमत असणाऱ्या घरांसाठी हे अनुदान मिळणार आहे, कर्जाची रक्कम ही 25 लाखांपर्यंतच असावी. कर्जाचा कालावधी 12 वर्षांचा, तर 8 लाख कर्जावर 4 टक्के व्याजदर सबसिडी मिळणार आहे.
PMAY-U 2.0 या वेबसाईटवर किंवा त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन अर्ज करू शकतात. यासाठी आधार कार्ड, बीपीएल/एसईसीसी यादीतील नावाचा पुरावा आणि बँक खात्याची माहिती इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.
PMAY-ची अधिकृत वेबसाइट, pmayg.nic.in ला भेट द्या. 'स्टेकहोल्डर्स' विभागात क्लिक करा आणि 'IAY/PMAYG लाभार्थी' किंवा 'लाभार्थी शोधा' यावर क्लिक करा. आणि सबमिट वर क्लिक करा.