Mangesh Mahale
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गुजरातमध्ये PM-Family Care Tracker (PM-FCT) प्रकल्पाची सुरुवात झाली.
गर्भधारणेपासून १८ वर्षांपर्यंत मुलांचे आरोग्य, शिक्षण, पोषण आणि लसीकरणावर डिजिटल पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे.
हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. कोणतीही पात्र महिला किंवा मूल सरकारी योजनांपासून वंचित राहू नये, हा योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग आणि शिक्षण विभागाची माहिती एकत्र जोडली जाणार आहे. त्यामुळे विविध सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल
या प्रणालीमध्ये सुमारे 16 सरकारी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम यांचा समावेश आहे.
पीएम पोषण योजना, मिशन वात्सल्य, सुकन्या समृद्धी योजना, पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम योजनेचा समावेश आहे
संबधिातांना योजनेबाबत अलर्ट करण्याची सुविधा यात आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाचे पोलिओ लसीकरण राहिले, तर आरोग्य विभागाकडून लगेच सूचना मिळेल.