सरकारनामा ब्यूरो
इंदिरा गांधी यांना लहापणापासूनच वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनाची आवड होती.
इंदिरा गांधी यांनी रॉयल बंगाल टायगरला या दिवशी (18 नोव्हेंबर) राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले.
वाघ संवर्धनामुळे भारतातील वाघांच्या शिकारीचे प्रमाण कमी होईल, अशी इंदिरा गांधी यांना आशा होती.
भारतातील वाघांच्या संख्येत घट होत असल्यामुळे वाघांच्या संवर्धनासाठी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'वाघ प्रकल्प' सुरू करण्यात आला.
उत्तर प्रदेशातील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून वाघ प्रकल्पाची सुरुवात झाली.
वाघ प्रकल्पांतर्गत वाघांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र नियमावली लागू करण्यात आली होती.