Rashmi Mane
केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जून अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
PM-KISAN योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 ची रक्कम
3 हप्त्यांमध्ये मिळते (प्रत्येकी 2,000 रुपये).
ज्यांनी अद्याप e-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांना यंदाचा हप्ता मिळणार नाही.
आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. बँक खाते सक्रिय असावे आणि भूमी अभिलेख वैध आणि अद्ययावत असावेत.
चुकीचा IFSC कोड असल्यास तसेच बँक खाते बंद झाल्यास आणि
अपूर्ण किंवा चुकलेली माहिती दिल्यास.
pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्जाची स्थिती आणि पेमेंट स्टेटस तपासता येते.
जवळच्या CSC केंद्रात जा आणि तालुका कृषी अधिकारी किंवा स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क साधा.
फेब्रुवारी 2025 मध्ये बिहारमधील कार्यक्रमातून 9 कोटी शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात आला होता.