PM Kisan : मोठी बातमी: प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 'पीएम किसान' 21 वा हप्ता! तारीख जाहीर

Rashmi Mane

प्रतिक्षा अखेर

शेतकऱ्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. पीएम किसान सम्मान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी थेट खात्यात जमा होणार आहे. अशी माहिती सरकारने अधिकृत एक्स अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

प्रत्येक शेतकऱ्याला 2,000 रुपये

योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांची रक्कम जमा केली जाईल. अनेक महिन्यांपासून किस्त येण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

PM Kisan scheme | sarkarnama

सरकारची अधिकृत घोषणा

14 नोव्हेंबरला सरकारने एक्सवर पोस्ट करून हप्ता ट्रान्सफरची तारीख जाहीर केली.
या पोस्टमध्ये लिहिले की, "पीएम-किसान की 21वीं किस्त का हस्तांतरण दिनांक – 19 नवंबर 2025"

PM Kisan 2025

रजिस्ट्रेशनसंबंधी महत्त्वाची सूचना

हप्ता जाहीर करतानाच सरकारने एक नवीन सूचना दिली आहे की पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी (Registration) पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा किस्त मिळण्यात अडचण येऊ शकते.

PM Kisan Yojana | Sarkarnama

लाभार्थांनी यादी कशी पाहावी?

अनेक शेतकऱ्यांना अजूनही आपले नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही, याबाबत संभ्रम असतो. सरकारने यासाठी सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे:

PM Kisan 2025 | Sarkarnama

कशी आहे प्रोसेस?

  1. अधिकृत पीएम किसान पोर्टलवर जा.

  2. होमपेजवरील ‘किसान कॉर्नर’ पर्याय निवडा.

  3. तेथे दिसणाऱ्या ‘लाभार्थी सूची’ (Beneficiary List) लिंकवर क्लिक करा.

PM Kisan Yojana | Sarkarnama

प्रोसेस

  1. आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव यांची माहिती भरा.

  2. कॅप्चा कोड भरून सबमिट करा.

  3. त्यानंतर पूर्ण लाभार्थी यादी स्क्रीनवर दिसेल.

PM Kisan scheme | sarkarnama

पीएम किसान योजना

ही देशातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार देणारी महत्वाची योजना आहे.

PM Kisan scheme

Next : नितीश कुमार यांचे शिक्षण किती? वर्गात होते टाॅपर 

येथे क्लिक करा