PM Kisan Installment : PM किसानच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट: 20 जूनला खरंच पैसे खात्यात जमा होणार? समोर आली मोठी अपटेड!

Rashmi Mane

मोठी अपडेट!

20 जून रोजी पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, हप्ता मिळण्यापूर्वी लाखो लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

PM Kisan Yojana 21st installment

2 लाख शेतकऱ्यांना मोठा धक्का

यंदाच्या हप्त्याआधी सुमारे 2 लाख शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

PM Kisan Yojana 21st installment

नावे का वगळली गेली?

e-KYC पूर्ण न करणे, भूमी अभिलेखांची माहिती अपडेट नसणे किंवा पात्रतेच्या नियमांचे उल्लंघन यामुळे अनेक लाभार्थी अपात्र ठरले आहेत.

PM Kisan Yojana 21st installment

कोणाला मिळणार नाही लाभ?

एकाच कुटुंबातील नियमांपेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असतील किंवा जमीन मालकीशी संबंधित अटी पूर्ण होत नसतील तर हप्ता मिळणार नाही.

PM Kisan Yojana 21st installment

लाभार्थ्यांची संख्या कमी

22 व्या हप्त्यात सुमारे 94.6 दशलक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. यावेळी 94.4 दशलक्ष शेतकऱ्यांच्या खात्यातच रक्कम जमा होणार आहे.

PM Kisan Yojana

किती पैसे मिळणार?

23 व्या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 जमा केले जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून हा निधी वितरित केला जाणार आहे.

PM Kisan 2025

तुमचे नाव यादीत आहे का?

PM किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी क्रमांक आणि OTPच्या मदतीने लाभार्थी स्थिती तपासता येते. e-KYC पूर्ण असल्याची खात्री करा.

PM Kisan Yojana | Sarkarnama

तातडीने करा हे काम

जर e-KYC किंवा जमीन नोंदी अद्याप अपडेट केल्या नसतील, तर त्वरित प्रक्रिया पूर्ण करा. अन्यथा 23 व्या हप्त्याचे 2,000 तुमच्या खात्यात जमा होण्यास अडचण येऊ शकते.

PM Kisan Yojana | Sarkarnama

Next : बोगस मतदारांना चाप! पुण्यात २० जूनपासून मतदार याद्यांचे 'ऑपरेशन क्लीन'

येथे क्लिक करा