Rashmi Mane
शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, संपूर्ण माहिती जाणून घ्या.
केंद्र सरकारची योजना, ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हप्त्यांचे पैसे जमा झाले आहेत.
जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत.
हप्त्यासाठी 'केवायसी' अनिवार्य! तुम्ही जर e-KYC पूर्ण केलं नसेल, तर तुमचं पेमेंट थांबू शकतं.
जवळच्या CSC सेंटरवर जा CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) वर जाऊन तुमचं आधार कार्ड दाखवा आणि KYC प्रक्रिया पूर्ण करा.
pmkisan.gov.in वर जा.
'फार्मर कॉर्नर' वर क्लिक करा.
'e-KYC' निवडा.
आधार नंबर टाका आणि OTP द्वारे प्रक्रिया पूर्ण करा.
तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांनाही हप्त्याची व KYC ची माहिती शेअर करा!