Post Office Scheme : 'पैसा सुरक्षित, नफा जबरदस्त!', पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम देणार 2 लाखांचे व्याज; आजच करा अर्ज!

Rashmi Mane

पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना देशभरात मोठी लोकप्रियता मिळत आहे.

Indian Post Office Schem | Sarkarnama

मोठा आधार

सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा या दोन गोष्टींचा विचार करणाऱ्या लोकांसाठी या योजना मोठा आधार बनल्या आहेत.

Indian Post Office Scheme | Sarkarnama

पर्याय उपलब्ध

सरकारकडून हमी असलेल्या या स्कीम्समध्ये मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी पर्याय उपलब्ध आहेत.

Indian Post Office Scheme | Sarkarnama

'टाइम डिपॉझिट स्कीम'

याच योजनांपैकी एक म्हणजे 'पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम', जी स्थिर आणि जोखमीशिवाय परतावा देणारी योजना म्हणून ओळखली जाते.

Indian Post Office Scheme | Sarkarnama

व्याजदर

सरकारकडून टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणुकीच्या कालावधीनुसार वेगवेगळे व्याजदर दिले जातात.

  • 1 वर्षांसाठी – 6.9%

  • 2 वर्षांसाठी – 7%

  • 3 वर्षांसाठी – 7.1%

  • 5 वर्षांसाठी – 7.5%

Indian Post Office Scheme | Sarkarnama

योजना अधिक आकर्षक

यामुळे गुंतवणूकदार आपल्याला सोयीचा कालावधी निवडून त्यानुसार परतावा मिळवू शकतात. विशेषतः 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर मिळणारा 7.5% व्याजदर ही योजना अधिक आकर्षक बनवतो.

Indian Post Office Scheme | Sarkarnama

2 लाखांहून अधिक नफा?

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममधून मोठा परतावा कसा मिळू शकतो, याचे गणित अगदी सोपे आहे. जर एखाद्याने 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले, तर त्या रकमेला 7.5% वार्षिक व्याजदराने एकूण 2,24,974 रुपये इतका व्याजरकमेचा फायदा मिळतो.

Indian Post Office Scheme | Sarkarnama

अधिक कमाई

मॅच्युरिटीच्या वेळी गुंतवणूकदाराला एकूण 7,24,974 रुपये परत मिळतात. म्हणजेच केवळ व्याजातूनच 2 लाखांपेक्षा अधिकची कमाई होऊ शकते.

Indian Post Office Scheme | Sarkarnama

शून्य जोखीम आणि करसवलतीचा लाभ

ही योजना पूर्णपणे जोखीममुक्त (Risk-Free) आहे, कारण तिची हमी थेट भारत सरकारकडे आहे. यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे 5 वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर इनकम टॅक्स एक्ट 1961 च्या सेक्शन 80C अंतर्गत करसवलत मिळते.

Post Office Scheme | Sarkarnama

व्याज वार्षिक पद्धतीने

ही योजना कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे उघडता येते. स्थिर, सुरक्षित आणि परतावा निश्चित असलेली योजना शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट स्कीम नक्कीच एक मजबूत पर्याय ठरू शकतो.

Post Office Scheme | Sarkarnama

Next : बहिणींनो 'E-kyc'ची चिंता मिटणार; 1 कोटी महिलांना फायदा! निवडणुका होईपर्यंतची डेडलाईन? 

येथे क्लिक करा