Rashmi Mane
शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार 21 वा हप्ता.
नवरात्र आणि दिवाळीच्या आधी सरकार 21व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची शक्यता आहे. सुमारे 10 कोटी किसानांना मिळणार थेट आर्थिक मदत मिळणार.
20वा हप्ता या वर्षी 2 ऑगस्टला जमा केला गेला होता.. देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता पीएम किसान योजनेचा हप्ता.
सरकारने अद्याप तारीख जाहीर केलेली नाही. पण अंदाज आहे की ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांना प्रतीक्षा संपेल.
PM Kisan योजनेत प्रत्येक हप्ता 2,000 रुपये. वर्षभरात तीन हप्त्यात एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.
पण जर शेतकऱ्यांनी e-KYC अद्याप पूर्ण केलं नाही तर त्यांचा हप्ता थांबू शकतो.
तुम्हीही जर e-KYC केले नाही, तर लगेच करा. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवते. त्यामुळे तत्काळ ई-KYC पूर्ण करा आणि आधार लिंक करा!