Aslam Shanedivan
केंद्र सरकारकडून देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पीएम किसान योजना सुरू करण्यात आली आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये देण्यात येतात. तर एकूण ३ हप्ते असतात. ज्यात प्रत्येत हप्त्यात २००० रुपये जमा केले जातात.
केंद्र सरकारने १३ मार्च रोजी २२वा हप्ता जारी केला असून जवळपास ९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा झाले आहेत.
पण या योजनेची केवायसी, फार्मर आयडीसह इतर काही कारणांमुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही.
अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत २२वा हप्ता अजूनही मिळालेला नाही. पण आता अशा शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. ते तक्रार करू शकतात
यासाठी सरकारने 155261 किंवा 011-24300606 असे हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. जेथे आपण तक्रार नोंदवू शकतो.
याशिवाय pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर देखील तक्रार पाठवू शकता. यासाठी तुमचे नाव, रजिस्ट्रेशन नंबर आणि तक्रारीबाबतची माहिती लिहायची आहे.
हेल्पलाइन नंबर किंवा ईमेल आयडीवर तक्रार पाठवल्यानंतर त्याची दखल घेवून योग्य कारवाई केल्यानंतर तुमचे पैसे दिले जातात.
बँक डिटेल्समध्ये चूक, ईकेवायसी पूर्ण नाही किंवा चुकीची माहिती अशा कारणांमुळे पीएम किसान योजनेअंतर्गत पैसे जमा होत नाहीत