Rashmi Mane
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी.
ऑक्टोबर महिन्यात पीएम किसान योजनेचा हप्ता येण्याची अपेक्षा होती,
मात्र तो थोडा उशिरा येणार आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 21वा हप्ता जाहीर करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिहार विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. त्याआधी पैसे जाहीर करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कारण आचारसंहिता लागू झाल्यावर निधी देण्यात अडथळे येऊ शकतात.
ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 आर्थिक मदत दिली जाते. ती तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 देण्यात येईल.
आजवर सरकारने एकूण 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. 21वा हप्ता लवकरच मिळणार असून लाखो शेतकऱ्यांचे लक्ष याकडे लागले आहे.
हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना आधीच 21वा हप्ता मिळाला आहे. पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला होता.
जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांनाही 21व्या हप्त्याचे पैसे वितरित करण्यात आले आहेत.
यामुळे इतर राज्यांतील शेतकरी आता आपला हप्ता मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.