Rashmi Mane
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 75वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वयातही त्यांची ऊर्जा आणि तेज पाहून सर्वांनाच उत्सुकता असते – त्यांचा लाइफस्टाइल नक्की कशी आहे?
मोदीजींच्या दैनंदिन जीवनात योग आणि प्राणायामला सर्वाधिक महत्त्व आहे. ते रोज सकाळी चालतात, मेडिटेशन करतात आणि त्यानंतर सूर्यनमस्कार व योगासने करतात.
योगामुळे पंतप्रधानांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते. याच ऊर्जेमुळे ते दिवसातून फक्त 3-4 तास झोपूनही सतत कार्यरत राहतात.
मोदीजी साधे व संतुलित अन्न घेतात. ते तेलकट, तिखट पदार्थ टाळतात आणि नेहमी हलके व पौष्टिक खाण्यावर भर देतात.
त्यांना गुजराती डिशेस, विशेषतः खिचडी खूप आवडते. साधे, पण आरोग्यदायी पदार्थ त्यांचा आहाराचा नेहमीचा मुख्य भाग असतो.
त्यांचा नियम ठाम आहे. संध्याकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत. यामुळे शरीर हलके राहते आणि पचन सुधारते.
योग, संतुलित आहार, कमी झोपेतही ऊर्जावान राहणे या सर्वामुळे नरेंद्र मोदी आजही तरुणांसाठी फिटनेस आयकॉन ठरतात.