Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तांना दिलासा मिळणार आहे.
या आयोगामुळे सुमारे 1 कोटी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारक यांना थेट फायदा होणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, 8व्या वेतन आयोगामुळे बेसिक पगारात 40 ते 50% पर्यंत वाढ होऊ शकते.
फिटमेंट फॅक्टर हा एक गुणक (multiplier) आहे, ज्याद्वारे जुन्या पगाराच्या आधारावर नवीन पगार ठरतो.
यावेळी 2.28 ते 2.86 या दरम्यान फिटमेंट फॅक्टर असण्याची शक्यता आहे.
फिटमेंट फॅक्टरनुसार कर्मचार्यांचा बेसिक पगार ₹46,600 ते ₹57,200 पर्यंत जाऊ शकतो.
तज्ञांच मते, 25-30% पर्यंत पेंशन वाढ होण्याची शक्यता आहे.
या वेतन आयोगामुळे पारिवारिक पेंशनधारकांनाही दरमहा जास्त रक्कम मिळेल, हा एक मोठा दिलासा आहे.