Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत.
कझान येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी ते खास येथे पोहोचले आहेत.
ते दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यात अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
कझान येथे 16 वी ब्रिक्स शिखर परिषद रशियाच्या अध्यक्षतेखाली 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान होत आहे.
या परिषदेत आर्थिक सहकार्य, हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यासारख्या जागतिक प्रश्नांवर भर दिला जाईल.
मागच्या चार महिन्यात पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा रशियाला गेले आहेत. याआधी ते जुलैमध्ये रशियाला गेले होते.
पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांचे लाडू देत स्वागत करण्यात आले.
आज संध्याकाळी ते ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील. रात्रीच्या जेवणादरम्यान ते येथील अनेक नेत्यांशी अनौपचारिक चर्चा करू शकतात.