Jagdish Patil
पंतप्रधान मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील महिलांसाठीच्या एका खास योजनेचं उद्घाटन केलं.
या योजनेमुळे बिहारमधील 75 लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट 10 हजार रूपये जमा होणार आहेत.
यासाठी साडेसात हजार कोटींचा खर्च येणार आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षिक करण्यासाठी NDA ने मोठा डाव टाकल्याचं बोललं जात आहे.
'मुख्यमंत्री महिला रोजगार योजना' असं या योजनेला नाव देण्यात आलं असून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
महिलांना सुरूवातीला 10 हजारांचं अर्थसहाय्य केलं जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं 2 लाखापर्यंतची आर्थिक मदत केली जाणार आहे.
लाभार्थी महिलांना स्वयम सहाय्यता गटाशी जोडलं जाईल. त्यामुळे त्यांना रोजगार सुरू करण्यासाठी ट्रेनिंग दिलं जाईल.
यासाठी बिहारमध्ये ग्रामीण बाजारपेठ देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, एका कुटुंबातील एकाच महिलेला ही योजना लागू असणार आहे.
या योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे, स्वयंरोजगार ECf उपजीविकेच्या संधींद्वारे त्यांचे सक्षमीकरण वाढवणे हा आहे.
शेती, पशुपालन, शिवणकाम यासारखे लघु उद्योगांसारखे आवडीचे रोजगार किंवा उपजीविका उपक्रम महिलांना सुरू करता येतील विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.