Mayur Ratnaparkhe
१९६०चा सिंधू जल करार स्थगित राखला जाईल. जोपर्यंत पाकिस्तान विश्वसनीय आणि अपरवर्तनीयरित्या सीमेपलीकडील दहशतवादास पाठिंबा देणे थांबवत नाही.
अटारी बॉर्डर तत्काळ प्रभावाने बंद केली आहे. जी लोकं वैध आधारासह पलीकडे गेले आहेत, ते १ मे २०२५च्या आधी त्याच मार्गाने परत येऊ शकतात.
सार्क व्हिसा एक्झेम्पशन स्कीम व्हिसाखाली पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
SVES व्हिसाखाली भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांचा कालावधी असणार आहे
भारत इस्लामाबादेतील आपल्या भारतीय उच्चआयुक्तालयातील संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना परत बोलावणार
नवी दिल्लीत पाकिस्तानी उच्चआयुक्तलायातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना अनावश्यक व्यक्ती म्हणून या बैठकीत घोषित करण्यात आले आहे.
सीसीएस बैठकीतील निर्णयांबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकारपरिषदेत दिली माहिती.