Mangesh Mahale
नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध पारले 'मेलोडी' टॉफीचे पाकीट भेट दिले.
भारतामध्ये बच्चेकंपनीत लोकप्रिय असलेल्या पारले कंपनीच्या 'मेलोडी' चॉकलेटी टॉफीचे अख्य़े पँकेट मोदींनी मेलोनी यांना दिले.
हा अनपेक्षित आणि गोड नजराणा पाहून मेलोनी अतिशय आनंदाने खळखळून हसल्या. त्यांनी या प्रसंगाचा एक व्हिडिओ 'एक्स' (X) वर शेअर केला आहे.
या चॉकलेटी सरप्राईजची जगभर चर्चा सुरू झाली आहे. "पंतप्रधान मोदी माझ्यासाठी एक खास सरप्राईज गिफ्ट घेऊन आले आहेत." असे त्या म्हणाल्या.
त्यावर हसतमुख चेहऱ्याने मोदी म्हणतात, "मेलोडी!". मोदींचे हे उत्तर ऐकताच मेलोनी आणि मोदी दोघेही मनापासून हसताना दिसतात.
2023 मध्ये दुबईत झालेल्या 'COP28' परिषदेत मेलोनी यांनी मोदींसोबत एक सेल्फी शेअर केला होता. याला त्यांनी 'COP28 मध्ये चांगले मित्र #Melodi' असे कॅप्शन दिले होते.
मोदी-जॉर्जिया मेलोनी यांच्या नावांची अक्षरे जोडून सोशल मीडियावरील युजर्सनी 'Melodi' हा ट्रेंडिंग हॅशटॅग तयार केला होता.
रोममध्ये मेलोनी यांनी मोदींचे स्वागत पुन्हा एका सेल्फीने केले असून मोदींनी थेट मूळ 'मेलोडी' चॉकलेट देऊन या सोशल मीडिया ट्रेंडला अधिकृत आणि गोड दाद दिली आहे.