Rajanand More
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'X'वर पोस्ट शेअर करत 'भारत एक पूर्णपणे नवा खेळ खेळत आहे', असे म्हणत विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यांनी एका व्हिडिओ गेमचा आधार घेतला आहे.
२०१३ मध्ये भारताचा समावेश 'Fragile Five' अर्थव्यवस्थांमध्ये होता. आता भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
भारतात दारिद्य्र रेषेखाली लोकांचे प्रमाण २०१३ मधील २७ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे पोस्टमध्ये दाखवण्यात आले आहे.
स्वच्छता मोहिमेचे यश २०१३ मधील ३९ टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे कार्डमध्ये नमूद आहे. स्वच्छ भारत अभियानाचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
भारताची सौरऊर्जा क्षमता २०१३ मधील २.८२ गिगावॅटवरून १७५ गिगावॅटपर्यंत वाढल्याचे पोस्टमध्ये दाखवण्यात आले आहे.
भारतातील अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या २०१३ मधील एकवरून ४४० पर्यंत पोहोचल्याचे कार्डमध्ये दाखवले आहे.
रेल्वेच्या विद्युतीकरणाचे प्रमाण २०१३ मधील २० टक्क्यांवरून ९९.६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.
२०१३ मधील 3G काळात एक जीबी डेटासाठी ३०८ रुपये मोजावे लागत होते. आता 5G काळात हाच खर्च ७.५१ रुपये झाल्याचा दावा.
भारत पूर्वी संरक्षण साहित्याचा मोठा आयातदार होता. आता ८० हून अधिक देशांना संरक्षण साहित्य निर्यात करत असल्याचे कार्डमध्ये म्हटले आहे.
देशात १८२ नक्षलग्रस्त जिल्हे होते, आता ही संख्या शून्यावर आल्याचा करत मोदींनी देश नक्षलमुक्त झाला असल्याचे यातून दाखविले आहे.