सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीलंकेच्या तीन दिवसीसाच्या दौऱ्यावर होते.
मोदींनी रविवारी (ता.6) श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली .
मोदींनी श्रीलंकेच्या उत्तरेकडील प्रदेशाला राजधानी कोलंबोशी जोडणाऱ्या अनुराधापूरा येथील रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले.
पंतप्रधानांनी यावेळी येणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केले.
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पीएम मोदींनी शुभेच्छा दिल्या.
नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी अनुराधापूरा येथील रेल्वे स्थानाकावर स्थानिक लोकांची प्रंचड गर्दी पाहायला मिळाली.
पंतप्रधान आणि राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी अनुराधापूरा येथील महाबोधी मंदिरात दर्शन घेतले.
पीएम मोदींनी मंदिरातील बौद्ध भिक्षूच्या चरणी नतमस्तक झाले.