सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आज 119 वा एपिसोड प्रदर्शित झाला. या कार्यक्रमात त्यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहाणार आहोत.
मोदींनी मन की बातमध्ये इस्त्रोच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, देश हा इस्रोच्या 100 व्या प्रक्षेपणाचा साक्षीदार होता. हा फक्त आकडा नसून, अंतराळ आणि विज्ञानात आपण दररोज नवनवीन उंची गाठत आहोत हेच दिसून येते
गेल्या 10 वर्षात सुमारे 460 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले असून यामध्ये इतर देशांतील अनेक उपग्रहांचा समावेश आहे. पण गेल्या वर्षांत, अवकाश आणि विज्ञान क्षेत्रात नारी शक्तीचा सहभाग वाढलेला आहे.
पीएम मोदी म्हणाले की, 8 मार्च या दिवसी एक असा उपक्रम घेणार आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिला यावेळी भारतीयांबरोबर त्यांच्या कामाचा अनुभव सांगणार आहेत.
यावेळी पंतप्रधानांनी सांगितले की, ते AI च्या कार्यक्रमासाठी पॅरेसला गेलो होतो. तेव्हा देशातील लोक AI तंत्राचा वापर करुन देशाला प्रगतीच्या शिखरावर नेत आहेत. यामुळे भारताच्या प्रगतीचे भरभरून कौतुक होत आहे.
मोदींनी डेहराडूनमध्ये राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनावेळी एक अतिशय महत्त्वाचा विषय मांडला होता, आपल्याला जर तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनवायचे असेल तर लठ्ठपणाच्या समस्येवर मात करावी लागेल.
बोर्ड परीक्षेसाठी देशातील तरुणांना शुभेच्छा देत ते म्हणाले, कोणताही तणाव न घेता सकारात्मक भावनेने परीक्षा द्या.
उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दाखवून दिले की, अगदी सहजपणे कोणीही चॅम्पियन बनत नाही. मला आनंद आहे, आपल्या युवा खेळाडूंची जिद्द आणि शिस्तमुळे भारत आज जागतिक क्रीडा महाशक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असे देखील PM मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशातील नागरिकांना 'मन की बात'मधून संबोधित करतात. या संबोधनात ते राष्ट्राशी निगडीत समस्या आणि अनेक विषयावर चर्चा करतात.