Mayur Ratnaparkhe
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मोदी सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
शक्तिकांत दास यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव-२ नियुक्त करण्यात आलं आहे.
2018मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नियुक्त झाले होते आणि 10 डिसेंबर 2024 रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला होता.
67 वर्षीय शक्तिकांत दास हे ओडिशाची राजधानी भुवनेश्वरशी संबंधित आहे.
शक्तिकांत दास तामिळनाडू कॅडेरच्या 1980च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
केंद्र आणि तामिळनाडू सरकारांसाठी विविध पदांवर काम केले आहे.
केंद्रात त्यांना विविध टप्प्यात आर्थिक व्यवहार सचिव, वित्त सचिव आदी पदांची जबाबदारी सांभाळली.
२०१८ मध्ये, सरकारने आश्चर्यकारकपणे शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती केली.
शक्तिकांत दास यांनी उर्जित पटेल यांची जागा घेतली, ज्यांच्या नेतृत्वात डिमोनेटाइझेशन केले गेले होते.