Jagdish Patil
PM नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमातून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केलं.
तुमच्याशी बोलताना मनाला खूप वेदना होत आहेत. या हल्ल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक दुखावला आहे, अशा शब्दात त्यांनी आपली भावना त्यांनी व्यक्त केली.
मात्र, मी पीडित कुटुंबांना नक्कीच न्याय मिळेल. हल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर उत्तर दिले जाईल, असं म्हणत त्यांनी हल्लेखोरांना इशारा दिला.
ते म्हणाले "हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयांचे रक्त उसळलं आहे, याची मला कल्पना असून दहशतवादाविरोधातील युद्धात देशाची एकता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे."
काही लोकांना काश्मीरची प्रगती पाहवत नाही, हा भाग नेहमी जळत राहावं असं दहशतवाद्यांना आणि आकांना वाटतं असं म्हणत त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.
दहशतवादाविरोधात 140 कोटी भारतीय एक झाले आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारतीयांसोबत आहे. या हल्ल्याची जगभरात निंदा केली जात असल्याचं ते म्हणाले.
तर जागतिक नेत्यांनी मला फोन केलेत, पत्रे लिहित या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.