सरकारनामा ब्यूरो
लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर आहेत.
काशी संसद संस्कृत स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ वाराणसी विद्यापीठात त्यांच्या हस्ते पार पडला.
संत गुरू रविदास यांच्या ६४७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम सोहळ्यातही त्यांनी उपस्थिती लावली.
यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी संत गुरू रविदास यांना अभिवादन केले.
संत रविदासांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. जन्मस्थळ परिसरात यात्रेकरूंना मोठा दिलासा देणारी विविध विकासकामे केली आहेत.
वाराणसीमध्ये त्यांनी 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी केली.
आपल्या भाषणाद्वारे मोदींनी लोकांना संबोधित केले.
या सोहळ्याचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर करीत माहिती दिली.
R