Tutari Symbol : पवार गट पक्षचिन्हाची महाराष्ट्राशी नाळ; तुतारीचा अनोखा इतिहास!

Chetan Zadpe

महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य -

तुतारी हे महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य आहे. शुभप्रसंगी-मंगलप्रसंगी तुतारी हे वाद्य महाराष्ट्रात इतिहास काळापासून वाजवले जाते.

Tutari Symbol | Sarkarnama

राजकीय अधिष्ठान -

तुतारी हे वाद्य केवळ राजेशाही परंपरेशी जोडलेले नसून, अलीकडील काळात तुतारीला राजकीय परंपराही लाभली आहे. विविध राजकीय सभांची सुरुवात तुतारी वादनाने होत असे.

Tutari Symbol | Sarkarnama

स्फुलिंग चेतवणारे वाद्य -

महाराष्ट्राच्या संस्कृतीत ढोल-ताशे, हलगी, टाळ - मृदुंग, नगारे यासोबतच तुतारी ही ऊर्जा देणारी आणि मनात स्फुलिंग चेतवणारे वाद्य आहे.

Tutari Symbol | Sarkarnama

महाराष्ट्रीय लढवय्यांना प्रेरणा दिली -

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात महाराष्ट्रीयांच्या लढवय्यांच्या मनगटात बळ आणि विजयाची प्रेरणा देणारे हे वाद्य आहे.

Tutari Symbol | Sarkarnama

लढाईचे प्रतीक -

लढाईस जिंकणे, राजाचे आगमन होणे इत्यादी प्रसंगी तुतारी वाजवली जात असे. आता शुभप्रसंगी-सभा-समारंभांच्या उद्घाटनप्रसंगी तुतारी वाजवतात.

Tutari Symbol | Sarkarnama

इतरत्र कुठे तुतारी वाजवतात?

महाराष्ट्रासह तुतारी हे वाद्य दक्षिण भारतात, श्रीलंका आणि नेपाळमध्येही वाजवले जाते.

Tutari Symbol | Sarkarnama

निवडणुकीचे रणशिंग -

आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार म्हणजेच राष्ट्रवादीच्या पवार गटाला तुतारी हे वाद्य पक्षचिन्ह म्हणून बहाल करण्यात आले आहे. पक्ष तुतारी वाजवूनच निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे.

R

Tutari Symbol | Sarkarnama

NEXT : पक्ष बदलणाऱ्यांसाठी भाजप नंदनवन...

क्लिक करा...