सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हैदराबादच्या श्री उज्जयिनी महाकाली मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना देवीची फोटोफ्रेम भेट स्वरुपात दिली.
सुरक्षेसाठी मंदिराच्या आवारात यावेळी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता.
पवित्र मंदिराच्या दर्शनानंतर ते संगारेड्डी जिल्ह्याकडे रवाना झाले.
तेथे काढण्यात आलेल्या भव्य रॅलीदरम्यान त्यांनी जनतेला संबोधित केले.
जिल्ह्यातील 6,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यात त्यांनी तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
शिवाय हैदराबादमधील नागरी उड्डाण संशोधन संस्था (CARO) केंद्राचेही त्यांनी उद्घाटन केले.