'ब्रिक्स'च्या आधीच PM मोदी-पुतिन बैठक! संरक्षण, ऊर्जा, व्यापार करारांवर होणार चर्चा, पाकिस्तानची झोप उडवणारी डील

Roshan More

पुतिन-मोदी भेट

१८व्या ब्रिक्स परिषदेपूर्वी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशिशाचे राष्ट्रध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट होणार आहे. या भेटीत विविध कारार होतील.

PM Modi gift to Vladimir Putin | Sarkarnama

Su-57 स्टील्थ फायटर

रशिया भारताला ५व्या पिढीचे रडारला गुंगारा देणारे 'Su-57' फायटर जेट्स देणार आहे. त्या करारवर शिक्कामोर्तब होईल. रशिया या विमानाचे 'सोर्स कोड' आणि भारतात निर्मितीचे संपूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरित करेल. या कराराने पाकिस्तानाची झोप उडणार आहे.

PM Modi gift to Vladimir Putin | Sarkarnama

HAL अन् AK-203!

Su-57 ची बांधणी आणि सर्व्हिसिंग आता थेट भारतात HAL द्वारे केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अमेठीतील AK-203 रायफल आणि ब्राह्मोस मिसाईल प्रकल्पाचा मोठा विस्तार केला जाईल.

PM Modi gift to Vladimir Putin | Sarkarnama

अणुऊर्जा करार

कुडनकुलमच्या यशानंतर आता ६ नवीन उच्च क्षमतेच्या अणुऊर्जा रिएक्टरसाठी नवी जागा निश्चित केली जाईल.औद्योगिक क्षेत्रासाठी 'स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स' विकसित करण्यावरही दोन्ही देशांचे एकमत झाले आहे.

PM Modi gift to Vladimir Putin | Sarkarnama

स्वस्त तेलाचा सुरक्षा कवच!

अमेरिकेच्या १००% टॅरिफच्या धमकीनंतरही भारत रशियाकडून स्वस्त कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार आहे. पश्चिमी निर्बंध टाळण्यासाठी स्वतंत्र शिपिंग, विमा आणि नवीन पेमेंट यंत्रणा तयार केली जात आहे.

Vladimir Putin | Sarkarnama

UPI अन् 'मीर' जोडणार!

भारत-रशियातील ९०% व्यापार आता डॉलरऐवजी स्वतःच्या चलनामध्ये (रुपया-रुबल) पूर्ण होत आहे.भारताचे UPI आणि रशियाचे 'Mir' पेमेंट नेटवर्क एकमेकांशी जोडून BRICS Pay लागू केला जाईल.

vladimir Putin Wealth | Sarkarnama

३ नवीन महामार्ग!

INSTC आणि चेन्नई-व्लादिवोस्तोक मार्गामुळे दोन्ही देशांतील सागरी प्रवासाचा वेळ ४० वरून थेट २० दिवसांवर येईल.बर्फाच्छादित आर्कटिक महासागरातील 'नॉर्दर्न सी रूट' विकसित करण्यासाठी रशियाने भारताला निमंत्रण दिले आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

NEXT : भारतात ब्रिक्सचा महासंग्राम! १४ वर्षांनंतर दिल्लीत भरणार महासत्तांचा दरबार; पुतीन येणार, जिनपिंग काय करणार?

BRICS | sarkarnama
येथे क्लिक करा