PM Narendra Modi: पीएम मोदी त्यांचे 'स्टायलिश' कपडे खरेदी करतात, ते दुकान नेमकं कुठं आहे? तिथे तुम्हीही खरेदी करू शकता...

Deepak Kulkarni

पेहरावही वैशिष्ट्यपूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कायमच चर्चा होत असते. त्यांची खास भाषण शैली, तसेच पेहरावही नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण राहिले आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

खादी- पारंपरिक भारतीय पोषाख

पंतप्रधान मोदी हे त्यांच्या पेहरावाबाबत अगदी काटेकोर असून साधेपणा आणि आकर्षक दिसण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या वॉर्डरोबमध्ये प्रामुख्यानं खादी आणि पारंपरिक भारतीय पोषाखांचा समावेश दिसून येत असतो.

PM Narendra Modi.jpg | Sarkarnama

डिझायनिंग टच

पंतप्रधानांच्या कपड्यांवर प्रसंगानुरुप नवनवीन खास डिझायनिंग टचही नेहमीच पाहायला मिळतो.पण मोदींच्या पेहरावाबद्दल नागरिकांच्या मनात आकर्षणासह प्रचंड कुतुहूलही असते.

PM Narendra Modi.jpg | Sarkarnama

'जेडब्लू'ला पसंती

पंतप्रधान मोदी यांना अनेकदा आपण कुर्ता-पायजमा अन् जॅकेटमध्ये पाहतो. ज्यात अर्ध्या बाह्यांचा सुती किंवा खादीचा कुर्ता आणि घट्ट चुडीदार पायजमा ही त्यांची आवडती जोडी आहे. अहमदाबादस्थित 'जेडब्लू' ही मोदींची अनेक वर्षांपासून कपड्यांच्या स्टाईलसाठी पहिली पसंती राहिली आहे.

PM Narendra Modi.jpg | Sarkarnama

1989 पासून मोदींसोबत...

फॅशन ब्रँड 'जेडब्लू'चे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक बिपिन चौहान आहेत. ते आणि त्यांचे बंधू जितेंद्र चौहान हे बंधू 1989 पासून मोदींचे कपडे शिवत आणि निवडत आले आहेत.

PM Narendra Modi.jpg | Sarkarnama

बिपिन चौहानांना बोलावणं...

पंतप्रधान मोदी हे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे प्रत्येकवेळी फॅशन ब्रँड 'जेडब्लू'ला कपड्यांच्या निवडीसाठी येऊ शकत नाही. म्हणून ते बिपिन चौहानांना माप घेण्यासाठी गांधीनगर किंवा दिल्लीत बिपिन चौहान यांना बोलावतात.

PM Narendra Modi.jpg | Sarkarnama

बारकाईनं लक्ष

पण मोदी त्यांच्या कपड्यांबाबत अतिशय काटेकोर असतात. तसेच त्यांचं कापड निवड, कापणी आणि शिलाईवर बारकाईनं लक्ष असतं. ते आरएसएसचे प्रचारक असल्यापासून अहमदाबादमधील जेडब्ल्यूचं मूळ रुप असलेल्या सुप्रीमो क्लोदिंग या छोट्या दुकानात येत असत.

PM Narendra Modi.jpg | Sarkarnama

ट्रेडमार्क वापरण्याची परवानगी

मोदी कुर्ता हा नवा ब्रँड बाजारपेठांमध्ये रुजवण्यात मोठं योगदान बिपिन चौहान यांचं राहिलं आहे. तेच या मोदी कुर्त्याचे जनक आहेत. स्वत: मोदींनी चौहान यांना 2012 मध्ये मोदी कुर्ता व मोदी जॅकेट हे ट्रेडमार्क वापरण्याची परवानगी दिली आहे.

PM Narendra Modi.jpg | Sarkarnama

कोट्यवधी रुपयांची उलाढाल

जेडब्ल्यूने मोदींच्या शैलीपासून प्रेरित अनेक उत्पादने बाजारात आणली असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या ब्रँडमार्फत केली जाते. पंतप्रधान मोदी सूट आणि वेस्टर्न लूकसाठी ट्रॉय कोस्टा यांना पसंती दिली जाते. तुम्हांलाही त्या दुकानातून कपडे खरेदी करता येऊ शकते.

PM Narendra Modi.jpg | Sarkarnama

NEXT: 1 एप्रिलपासून आयकर, PAN, ITR काय बदल होणार? जाणून घ्या!

PAN, ITR Update | Sarkarnama
येथे क्लिक करा...