PM Modi News : 'काँग्रेस घराणेशाही, अस्थिरतेची जननी'

Sachin Fulpagare

वाजवला लोकसभेचा बिगुल

लोकसभा निवडणुकीत एनडीएला 400 हून अधिक खासदार निवडून आणायचे आहेत. यासाठी भाजपला 370 चा पल्ला गाठायचाच आहे, असे म्हणत मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीचे टार्गेट दिले.

PM Modi On Elections | Sarkarnama

काँग्रेसवर साधला निशाणा

पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस म्हणजे अस्थिरता, घराणेशाही आणि जातीयवादाची जननी आहे. काँग्रेस अजूनही कटकारस्थान रचते आहे, असा आरोप मोदींनी केला.

PM Modi On Congress | Sarkarnama

'विरोधकांची खोटी आश्वासनं'

विरोधी पक्ष योजना पूर्ण करत नाहीत. खोटी आश्वासनं देण्यात यांचा हात कोणीच धरू शकत नाही. मात्र, 'विकसित भारत' ही आपली ग्वाही आहे, असे म्हणत मोदींनी विरोधकांवर टीका केली.

PM Modi on Opposition | Sarkarnama

'निवडणुकीसाठी सज्ज व्हा'

लोकसभा निवडणुकीसाठी पुढील 100 दिवस आपल्या सर्वांना एकजुटीने काम करायचे आहे. प्रत्येक मतदार, लाभार्थी आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचाये आहे, असे मोदी म्हणाले.

Bjp Meeting | Sarkarnama

'छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श'

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी सत्तेचा आनंद घेतला नाही. त्यांनी आपली मोहीम सुरूच ठेवली. तसेच मी सुख-वैभवासाठी जगणारा व्यक्ती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

PM Modi On Opposition | Sarkarnama

'सत्ता भोगण्यासाठी नाही'

भाजप सरकारची तिसरी टर्म ही सत्ता भोगण्यासाठी मागत नाहीये. मी देशाच्या विकासाचा संकल्प घेऊन निघालो आहे, असे मोदी पुढे म्हणाले.

PM Modi News | Sarkarnama

'भव्य संकल्प आणि स्वप्नंही'

आता देश छोटी स्वप्नं पाहणार नाही आणि छोटे संकल्प सोडणार नाही. आता स्वप्नंही भव्य असतील आणि संकल्पही. आपले स्वप्नं हे विकसित भारताचे आहे, असे त्यांनी सांगितले.

PM Modi Bjp Meeting | Sarkarnama

NEXT : संसदेत गाजलेल्या शेर-ओ-शायरी; नेत्यांनी विरोधकांना शायरीतून केले होते घायाळ...