Jagdish Patil
फ्रान्समधील एव्हियान येथे जी-७ शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एक बैठक पार पडली.
या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याकडे भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.
ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हा मुद्दा उपस्थित केला.
सागरी वाहतूक स्वातंत्र्याचा आदर करायला हवा ही भारताची भूमिका कायम राहिल्याचे मोदींनी यावेळी नमूद केले.
तर इराणसोबतच्या करारात नाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन, त्यांची सुनिश्चित केली जाईल, असा मला विश्वास असल्याचं मोदी म्हणाले.
यावेळी मोदी यांनी पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचललेल्या पावलांबाबत ट्रम्प यांचे आभार मानले.
भारत-अमेरिका संबंधांमध्ये आता एक नवा वेग आणि ऊर्जा दिसून येत असल्याचंही मोदी म्हणाले.
तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहणे अत्यंत आवश्यक असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं.
आखाती देशांमध्ये कायमस्वरूपी शांतता नांदेल, अशी मला आशा असल्याचं मोदी ट्रम्प यांच्याशी बोलताना म्हणाले.
या दोघांच्या संभाषणा दरम्यान ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी हे शांत, संयमी आणि जबरदस्त व्यक्ती असल्याचं ते म्हणाले.
तसंच जोपर्यंत मोदी नेते आहेत, तोपर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल, असंही ट्रम्प यांनी म्हटलं.