Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून तरुणांसाठी नवी योजना जाहीर केली आहे.
‘विकसित भारत रोजगार योजनेमुळे देशभरात तब्बल 3.5 कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत होईल.
पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY)’ या नव्या योजनेतून खासगी क्षेत्रातील पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना 15,000 रुपयांचं प्रोत्साहन दिलं जाणार आहे.
पहिल्यांदाच खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणींना सहा महिने पूर्ण केल्यानंतर 7,500 रुपये आणि 12 महिने पूर्ण झाल्यानंतर आणखी 7,500 रुपये अशा दोन हप्त्यांत ही रक्कम थेट ईपीएफओ खात्यात जमा केली जाईल.
खासगी क्षेत्रातील नोकरी असावी
मासिक पगार 1 लाखापेक्षा कमी असावा
EPFO मध्ये पहिल्यांदाच नोंद असलेले तरुणच या योजनेसाठी पात्र.
या योजनेचा लाभ फक्त खासगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्यांनाच मिळणार असून त्यांचा मासिक पगार एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावा, अशी अट आहे. तसेच ईपीएफओ किंवा Exempted Trust मध्ये 1 ऑगस्ट 2025 पूर्वी नाव नोंदलेलं नसणं आवश्यक आहे.
या योजनेमुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, सेवा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.