सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटसाठी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.
समिटनंतर त्यांनी अहमदाबादमधील एका फ्लॉवर शोला भेट दिली.
समिटचा भाग म्हणून गांधीनगरजवळील गिफ्ट सिटीमधील कार्यक्रमानंतर त्यांनी या शोला अचानकपणे भेट दिली
विमानतळावर जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी या ठिकाणी सुमारे 15 मिनिटे फेरफटका मारला.
साबरमती रिव्हरफ्रंटवर अहमदाबाद महानगरपालिकेने हा आकर्षक फ्लॉवर शो आयोजित केला आहे.
भारताने गेल्या काही वर्षांत केलेल्या अनेक ऐतिहासिक कामगिरीच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन या शोमध्ये केले आहे.
यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आणि विविध रंगीबेरंगी फुलांचा वापर करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला भेट दिल्यानंतर, पंतप्रधानांनी यावेळीचे फोटो शेअर केले आहेत.