प्रसन्न जकाते
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात असलेल्या सिंबोरा येथे अप्पर वर्धा धरण आहे.
अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला, जमीन आणि सरकारी नोकरी हवी आहे. त्यासाठी मोर्शीत 245 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.
अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी मुंबई मंत्रालयाच्या तिसऱ्या माळ्यावरून उड्या मारल्या होत्या.
मंत्रालयातील घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानंतर तातडीने बैठक घेतली होती.
बैठकीनंतरही मागण्या मान्य न झाल्याने अमरावतीत आंदोलन तीव्र झाले आहे.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात रात्रभर प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या दिला.
सरकारने निर्णय न घेतल्यास प्रकल्पग्रस्त 26 जानेवारीला जलसमाधी घेणार आहेत.