सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईशान्य भारत दौऱ्यावर असून, आसाम दौऱ्याचा त्यांचा हा दुसरा दिवस आहे.
काझिरंगा येथे रात्रीच्या विश्रांतीनंतर त्यांनी भल्या पहाटेच्या वेळी तेथील राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली.
पहाटे 5 वाजता त्यांनी या सफारीला सुरुवात केली, ती चक्क हत्तीवरून.
उद्यानाच्या सेंट्रल कोहोरा रेंजमधील मिहिमुख भागात सर्वप्रथम त्यांनी फेरफटका मारला.
उद्यानाच्या हिरवळीच्या मधोमध त्यांनी हत्तींसोबत क्वाॅलिटी टाइम स्पेंड केला.
लखीमाई, प्रद्युम्न आणि फुलमाई नावाच्या हत्तींना त्यांनी ऊस खाऊ घातले.
तेथील डोंगरदऱ्या, निसर्गाचे अतुलनीय सौंदर्य अनुभवत त्यांनी सर्वांना येथे भेट देण्याचे आवाहन केले.
दरम्यान, उद्यानाच्या संचालिका, वरिष्ठ वन अधिकारी, तसेच इतर कर्मचाऱ्यांची या वेळी त्यांनी भेट घेतली.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच भेट आहे.
R