सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी तमिळनाडू दौऱ्यावर गेले होते.
20,000 कोटींहून अधिक किमतीच्या नवीन उपक्रमांची पायाभरणी केली.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते तमिळनाडूमधील नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करणात आले.
तिरुचिरापल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विकसित केलेल्या नवीन टर्मिनल इमारतीच्या मॉडेलची पाहणी केली.
1982 मध्ये स्थापन झालेल्या भारतीदासन विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत.
या कार्यक्रमाला राज्यपाल आरएन रवी आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हेही उपस्थित होते.
तमिळनाडूमधील कार्यक्रमांनंतर त्यांनी लक्षद्वीपला भेट दिली.
आगामी काळात लक्षद्वीपच्या प्रगतीसाठी काम करण्याच्या निर्धार आहे असेही मोदींनी सांगितले.