Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी घानाच्या 2 दिवसीय दौऱ्यावर गेले असून, हा त्यांच्या घानातील पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आणि 21 तोपांच्या सलामीने सन्मानित करण्यात आले.
घानाचे राष्ट्रपती जॉन महामा यांनी पंतप्रधान मोदींना ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ या देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले.
“हा सन्मान 1.4 अब्ज भारतीय नागरिकांच्या वतीने स्वीकारतो. हा घाना-भारत यांच्यातील ऐतिहासिक नात्याचा सन्मान आहे,” असे मोदींनी सांगितले.
मोदी म्हणाले, “भारत व घाना यांच्यातील मैत्री ही समान मूल्ये, संघर्ष आणि समावेशी भविष्याच्या स्वप्नांवर आधारित आहे.”
ITEC व ICCR शिष्यवृत्ती दुप्पट
Skill Development Center स्थापनेची घोषणा
“Feed Ghana” कार्यक्रमात सहकार्य
जन औषधी केंद्रांची संकल्पना
वैक्सीन निर्मितीमध्ये भागीदारी
पारंपरिक वैद्यकीय शिक्षणावर संयुक्त MoU
भारत आणि घानाने दहशतवादविरोधी सहकार्य अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच संयुक्त राष्ट्र सुधारांवरील समान दृष्टिकोनावर सहमती.
कला-संगीत-वारसा यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण
BIS व GSA यांच्यात मानकीकरणावर करार
संयुक्त आयोग स्थापनेसाठी करार