Aslam Shanedivan
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून येथे आप, काँग्रेससह भाजप मैदानात उतरली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या प्रचाराचा नारळ अशोक विहारमध्ये फोडताना विविध प्रकल्पांची भेट दिले
शाळा आणि महाविद्यालयांशी संबंधित प्रकल्पांसह जेजे क्लस्टरमधील रहिवाशांसाठी 1,675 सदनिका असून यासाठी 4500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत
दिल्ली मेट्रोच्या फेज-4 अंतर्गत रिठाला-नरेला-कुंडली लाइनची पायाभरणी आणि दिल्ली-सहारनपूर राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले आहे
अशोक विहारमध्ये इन-सीटू झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत 1,675 सदनिकांचे उद्घाटन केले.
तसेच पंतप्रधान मोदींनी दोन शहरी पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटनही केले. नौरोजी नगर आणि सरोजिनी नगरमध्ये हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यामध्ये 2,500 हून अधिक निवासी युनिट्स आहेत.
द्वारका येथील सीबीएसई इंटिग्रेटेड ऑफिस कॉम्प्लेक्सचे उद्घाटनही केले असून यासाठी सुमारे 300 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.