Aslam Shanedivan
देशात घुसून केलेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला भारताने पाकिस्तानात घुसून उत्तर देत 'ऑपरेशन सिंदूर' राबवले.
यानंतर आता अख्या जगाला हा नवा भारत असून गप्प बसणाऱ्यातला नसल्याचा संदेश गेला आहे.
तर 'ऑपरेशन सिंदूर' च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच गृहराज्य गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस असून त्यांनी गुजरातमधील गांधीनगरमध्ये रोड शो केला.
तर आजच्या रोड शोमध्ये लोकांनी पंतप्रधानांचे जंगी स्वागत करत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला
यावेळी केंद्रीय मंत्री सीआर पाटील आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील उपस्थित होते.
यावेळी मोदींनी 'शहरी विकास वर्ष 2025' चे उद्घाटन करताना 5,536 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
काल त्यांनी वडोदरा, दाहोद, भूज, अहमदाबादला येथे रोड शो केला होता. जेथे देशभक्तीची लाट आल्यासारखे वाटल्याचे त्यांनी म्हटलं आहे.