Riteish Deshmukh Emotional Post: विलासराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त रितेश देशमुखची भावनिक पोस्ट, म्हटले...

Mayur Ratnaparkhe

विलासबागेत स्मृतीस्थळी - 

लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील विलासबागेतील विलासरावांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

परिवारातील सदस्यांची उपस्थिती -

यावेळी देशमुख परिवारातील सदस्यांसह काँग्रेसच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

भावनिक पोस्ट -

त्याचवेळी त्यांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख यांनी फेसबुकला भावनिक पोस्ट करीत त्यांच्या आठवणीना उजाळा दिला.

काय म्हटलं आहे पोस्टमध्ये? -

रितेश देशमुख पोस्टमध्ये म्हणतात, '’आधी आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करायचा विचार केला होता पप्पा, पण आता तुमचे नातवंडे हा दिवस त्यांच्या "आजोबांचा दिवस" म्हणून साजरा करू इच्छित आहेत.’’

बाभळगावचं महत्त्व -

‘’लातूरमधील बाभळगावला येणे म्हणजे तुमच्या मिठीत परत धावून आल्यासारखे वाटते. समाधान, तृप्ती, आनंद, परमशांती.’’

खूप आठवण येते -

‘’आम्हाला माहिती आहे, तुम्ही वरून आमच्यवर लक्ष ठेवून आहेत. खूप आठवण येतीय पप्पा.'' अशी पोस्ट अभिनेते रितेश देशमुख यांनी फेसुबकवर करीत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

धीरज देशमुख -

माजी आमदार धीरज देशमुख यांनीही वडिलांच्या स्मृतिस्तळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

अमित देशमुख -

विलासरावांचे मोठे पुत्र अमित देशमुख यांनीही वडिलांच्या स्मृतिस्थळास समोर हातजोडून स्मरण केले.

संपूर्ण देशमुख कुटुंब -

यावेळी विलासरावांच्या पत्नी वैशाली देशमुख, माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh), अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री जिनेलिया-देशमुख, माजी आमदार धीरज देशमुख व विलासारावांचे नातवंडे हजर होते.

Next : योगींच्या राज्यात कचऱ्यापासून सोन्याची निर्मिती? दावा करणारे धर्मपाल सिंह कोण?

येथे पाहा..