सरकारनामा ब्यूरो
प्रजासत्ताक दिनानिमित्ती दिल्लीच्या ड्युटी रोडवर रविवार (ता.26) परेड झाली. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देत. राष्ट्राच्यावतीने शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पुन्हा एकदा पीएम मोदींच्या पेहरावाची चर्चा सगळीकडे होत आहे.
यंदा पंतप्रधानांनी बंद गळा असलेला तपकिरी रंगाचा कोट घातला होता. अन् डोक्यावर लाल,पिवळ्या रंगाचा फेटा बांधला होता.
याशिवाय क्रीम कलरचा कुडता आणि पायजमा अशा खास लुकमध्ये मोदी दिसून आले.
पंतप्रधान मोदी यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत केले.
द्रौपदी मुर्मू यांनी तिरंगा फडकवला. यानंतर राष्ट्रगीत गायले गेले. राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी ध्वजाला सलामी दिली.
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे यावर्षीचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते.