Jagdish Patil
PM नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी 'मन की बात'वर या कार्यक्रमातून संवाद साधला.
आजचा 'मन की बात' हा कार्यक्रम 2024 वर्षातील शेवटचा आणि 117 वा भाग होता.
यावेळी त्यांनी सरकारकडून राबवल्या गेलेल्या आणि भविष्यात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर भाष्य केलं.
संविधानाच्या वारशाशी नागरिकांना जोडण्यासाठी एक वेबसाइट तयार केल्याचं त्यांनी सांगितलं.
जानेवारी महिन्यात होणाऱ्या महाकुंभमध्ये पहिल्यांदाच AI चा वापर केला जाणार असल्याचं PM म्हणाले.
यावेळी त्यांनी मुलांच्या ॲनिमेशन मालिका KTB ("क्रिश, त्रिश आणि बाल्टिबॉय) चा उल्लेख केला.
बस्तर ऑलिम्पिकवर बोलताना ते म्हणाले, बस्तरमध्ये एक अनोखं ऑलिम्पिक सुरू झालं आहे.
"हे ऑलिम्पिक अशा ठिकाणी घेण्यात आलं जे एकेकाळी माओवादी हिंसाचाराचे साक्षीदार होते."
तर जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट म्हणजेच WAVES पुढील वर्षी भारतात आयोजित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.