सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या वर्षातील 'मन की बात' च्या पहिल्या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या विषयावर भाष्य केले.
'मन की बात' हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो. परंतु प्रजासत्ताक दिनामुळे 118वा भाग आज (ता.19) ला प्रसारित करण्यात आला आहे.
मोदींनी नव्या वर्षातील काही महत्वाचे मुद्दे 'मन की बात'मध्ये सांगितले. कोणते आहेत ते मुद्दे जाणून घेऊयात..
2025 च्या सुरुवातीलाच अवकाशात उपग्रह सोडणारी बंगळुरू येथील स्टार्टअप Pixxel ही भारताची पहिली खासगी अवकाश कंपनी ठरली आहे. हा क्षण देशासाठी अभिमानास्पद होता, असे मोदी म्हणाले.
स्पेस डॉकिंगची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. अंतराळात मानवरहित डॉकिंग मोहिम भारताने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ही कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे, असेही मोदींनी सांगितले.
संविधानाच्या अंमलबजावणीला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. संविधानासाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या सर्वांनी पंतप्रधानांनी अभिवादन केले.
'नॅशनल वोटर्स डे' निमित्त पीएम मोदींनी निवडणूक आयोगाचेही आभार मानले. निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी मतदान प्रक्रियेत बदल करून ही प्रणाली अधिक मजबूत करण्यावर भर दिला, असे ते म्हणाले.
प्रयागराज येथून सुरु झालेल्या महाकुंभमेळ्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आहेत. हा महाकुंभ समानता-समरसता याचा संगम असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.