पाकने एअरबेस उध्वस्त केला? मोदींचे विमान तिथंच उतरलं अन् झाली पोलखोल...

Rajanand More

ऑपरेशन सिंदूर

भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या ऑपरेशन सिंदूरला मोठे यश मिळाले आहे. भारतीय लष्कराने पाकचे कंबरडे मोडले आहे.

Operation Sindoor | Sarkarnama

पंतप्रधानांचे संबोधन

दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (ता. 13) देशवासियांना संबोधित केले. त्यांनी पाकिस्तानला दहशतवाद थांबवला नाही तर पुन्हा हल्ला करण्याचा सूचक इशारा दिला आहे.

India Vs Pakistan | Sarkarnama

एअरबेसला भेट

ऑपरेशन सिंदूरमध्ये सर्वात मोलाची भूमिका ठरली ती हवाई दलाची. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी मंगळवारी सकाळीच हवाई दलाचा एअरबेस गाठला.

PM Narendra Modi Visit to Adampur Airbase | Sarkarnama

आदमपूरला पसंती

पंतप्रधानांनी पंजाबमधील आदमपूर एअरबेसला पसंती दिली. याठिकाणी सकाळीच जात त्यांनी तेथील पायलट, इतर अधिकारी, जवानांशी संवाद साधला.

PM Narendra Modi Visit to Adampur Airbase | Sarkarnama

जवान आनंदित

एअरबेसला पंतप्रधानांनी भेट दिल्याने येथील जवानांमध्ये आनंद पसरला होता. याबाबतचे फोटो पंतप्रधानांनी सोशल मीडियात पोस्ट केले होते.

PM Narendra Modi Visit to Adampur Airbase | Sarkarnama

पाकचा खोटा प्रचार

हे एअरबेस पाकिस्तानच्या हल्ल्यात उध्वस्त झाल्याचा खोटा प्रचार करण्यात आला होता. भारतीय हवाईदलाने यापूर्वीच पाकचा दावा खोडून काढला होता.

PM Narendra Modi Visit to Adampur Airbase | Sarkarnama

पंतप्रधानांचा संदेश

पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसलाच भेट देत खोटा दावा करणाऱ्या पाकची पोलखोल केली आहे. पंतप्रधान मोदींचे विमानही या एअरबेसवर उतरले.

PM Narendra Modi Visit to Adampur Airbase | Sarkarnama

महत्वाचा एअरबेस

आदमपूर हे हवाई तळ मिग 29 या लढाऊ विमानांचे तळ आहे. पाकिस्तानी सीमेजवळच हे एअरबेस असल्याने पाकिस्तानसाठी नेहमीच डोळ्यात खुपणारे ठरले आहे. या एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता.

PM Narendra Modi Visit to Adampur Airbase | Sarkarnama

NEXT : पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करणारे 'हे' आहेत भारतीय लष्कराचे तीन नायक

येथे क्लिक करा.