Jagdish Patil
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीसाठी कुस्तीपटू विनेश फोगट अपात्र ठरली अन् अवघ्या भारताच्या पदरी निराशा आली.
विनेशने मंगळवारी उपांत्य फेरीत क्यूबाच्या युस्नेलिस गुझमान लोपेझचा 5-0 गुणांनी पराभव केला होता.
ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ती अपात्र ठरल्यामुळे तिचं आणि भारताचं सुवर्णपदक मिळवण्याचं स्वप्न भंगल. त्यानंतर विनेशला धीर देण्यासाठी PM मोदी यांनी ट्विट केलं.
मोदींनी ट्विटमध्ये लिहिलं, ‘विनेश, चॅम्पियन्समध्ये तू चॅम्पियन आहेस. तू भारताचा अभिमान आहेस, भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजच्या धक्क्याने मन दुखावलं. ही निराशा शब्दांत व्यक्त करता येणार नाही.
'तू लवचिकतेचं प्रतीक आहेस. आव्हानं स्वीकारणं तुझा स्वभाव आहे. आणखी मजबूत बनून परत ये. आम्ही सर्वजण तुझ्या पाठिशी आहोत.' अशा शब्दात मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"विनेशची कारकीर्द चमकदार आहे. तिने विश्वविजेत्याला पराभूत केलं आहे. आजची घटना केवळ तिच्या करिअरमधील एक वाईट अपवाद असून ती पुन्हा जोमान उभारी घेईल अन् विजेती बनून परतेल," असं शहा यांनी म्हटलं.
राहुल गांधींनीही या घटनेवर निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, विश्वविजेत्या कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठणारी भारताची शान विनेशला अपात्र ठरवण्यात आलं, हे दुर्दैवी आहे.
"भारतीय ऑलिम्पिक संघटना या निर्णयाला जोरदार आव्हान देईल आणि देशाच्या कन्येला न्याय देईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. विनेश हिम्मत गमावणारी नाही, ती आणखी मजबूतपणे रिंगणात परतेल हा विश्वास आम्हाला आहे."
तू नेहमीच देशाचा अभिमान वाढवलास. आजही संपूर्ण देश तुझी ताकद म्हणून तुमच्या पाठीशी उभा असल्याचं राहुल गांधी म्हणाले.