सरकारनामा ब्यूरो
गुजरातमधील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाबा विश्वनाथांच्या काशी नगरीमध्ये हजर झाले आहेत.
काशी नगरीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
काशीत उतरल्यावर नुकतेच उद्घाटन झालेल्या शिवपूर-फुलवारिया-लहारतारा मार्गाची मध्यरात्री त्यांनी पाहणी केली.
पीएम मोदी हे कारमधून अचानक खाली उतरले आणि योगी आदित्यनाथ यांच्यासोबत त्यांनी 1.25 किमी अंतर पायी पार केले. त्यांनी 14 मिनिटे येथे फेरफटका मारला.
वाराणसीमध्ये ते 14,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, तसेच उद्घाटन करणार आहेत.
काक्रापार अणुऊर्जा केंद्रातील दोन नवीन प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्सचे त्यांनी उद्घाटन केले.
मंदिर परिसरात संत रविदासांच्या पुतळ्याचे अनावरण करून जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत.
दिवसभरात ते BHU चा कार्यक्रम, वाराणसी-रांची-कोलकाता एक्स्प्रेस वेची पायाभरणी, एलपीजी बॉटलिंग प्लांट, तसेच इतर प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि आढावा घेतील.
R