सरकारनामा ब्यूरो
पुण्यातील प्रवाशाच्या सुरक्षतेशाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड PMPML ने मोठा निर्णय घेतला आहे.
काही दिवसापूर्वी घडलेल्या एका घटनेमध्ये मुंबई-पुणे मार्गावरील ई-शिवनेरी बस चालवताना बस चालक मोबाईलवर क्रिकेट मॅच बघत होता यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) त्यांचे निलंबन केले होते.
या घटनेचा व्हिडिओ समोर येताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
पीएमपीएलच्या नियमावलीनुसार एखादा चालक मोबाईल वापरताना किंवा तंबाखू खाताना आढळल्यास त्याचे निलंबन होऊ शकते.
नियमांचे उल्लंघन केल्यास 2 महिन्यांसाठी निलंबन होणार असल्याच नियमावलीत म्हटले आहे.
जर कोणत्याही बस चालक प्रवासादरम्यान हे नियम तोडताना दिसल्यास प्रवासी 9881495589 या व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करू शकतात.
complaints@pmpml.org या ईमेलवर तक्रार पाठवू शकतात.