सरकारनामा ब्यूरो
नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान सोमवारी (18नोव्हेंबर ला) G20 शिखर परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ब्राझील पोहचले आहेत.
मोदींचं आगमन विमानतळावर झाल्यानंतर तेथील नागरिकांनी आणि सांस्कृतिक मंत्र्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.
नरेंद्र मोदी 19 व्या G20 शिखर परिषदेत 'ट्रोइका' सदस्य म्हणून सहभागी होणार आहेत. भारताबरोबर G20 परिषदेत ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हे देश ट्रोइकाचे सदस्य असणार आहेत.
शिखर परिषदेच्या तयारीसाठी तिन्ही सदस्यमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन हे देखील उपस्थित राहणार आहेत.
नायजेरियाच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींना देशाचा राष्ट्रीय पुरस्कार 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' (GCON) देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
मोदी हे हा सन्मान मिळवणारे जगात दुसरे व्यक्ती ठरलेले आहेत. मोदींना भारता बाहेरुन मिळालेला हा 17 वा अंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राझील विमानतळावरील फोटो X या प्लॅटफॉर्मवर शेअर केलं आहे.
तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदी 19 ते 21 नोव्हेंबरला 'गयान'ला भेट देणार आहेत.