सरकारनामा ब्यूरो
आम आदमी (आप) पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे वरिष्ठ मंत्री कैलास गेहलोत यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
कैलाश हे दिल्ली सरकारमधील प्रमुख मंत्री होते. त्यांच्याकडे परिवहन, आयटी आणि बाल विकास खात्याच्या मंत्रिपदाचा भार होता.
कैलाश गहलोत यांचा जन्म जाट कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र आहे. तर, त्यांचीपत्नी मौसमी आणि दोन मुलींसोबत ते राहतात.
कैलाश यांनी बॅचलर ऑफ आर्टस, बॅचलर ऑफ लॉ आणि मास्टर ऑफ लॉची डिग्री दिल्ली यूनिवर्सिटीतून घेतली आहे.
त्यांनी सुप्रीम कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टात तब्बल 16 वर्ष वकील म्हणून काम केले आहे.
2005 आणि 2007 या कालावधीपर्यत त्यांची निवड दिल्ली उच्च न्यायालयाच्या 'बार असोसिएशनचे' कार्यकारी सदस्य म्हणून करण्यात आली होती. कैलाश गेहलोत यांनी दिल्ली सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या खाती सांभाळली आहेत.
2015 मध्ये त्यांनी त्यांची पहिली निवडणूक नजफगड या मतदारसंघातून लढवली होती.
2017 मध्ये त्यांना दिल्ली सरकारकडून मोठी जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा कैलाश यांच्याकडे वाहतूक, कायदा, न्याय आणि विधिमंडळाचे कामकाज, माहिती आणि तंत्रज्ञान, तसेच प्रशासकीय सुधारणा यासारखी मोठी खाती त्यांच्याकडे होती.